शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट

कुडाळ : शिवसेना कुडाळ उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईतील ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अरविंद करलकर यांनी कुडाळ आणि बांव गावातील विकासकामांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चर्चा केली. कुडाळ तालुका तसेच बांव गावातील रस्ते तसेच अन्य मूलभूत सुविधा याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरघोस निधी देण्यात येईल,असे आश्वासन अरविंद करलकर यांना दिले. यावेळी शाखाप्रमुख माड्याची वाडी रामकृष्ण गडकरी, विठ्ठल ठाकुर, हनुमंत लाड, पावशी महिला संघटक आराध्या करलकर उपस्थित होते.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!