अवकाळीचा तडाखा, कोकणातील आंबा, काजू, जांभूळ धोक्यात
पुढील पाच दिवस वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील पाच दिवस सोसाट्याचा वारा विजांचा लखलखाट आणि मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. काल संध्याकाळी तसेच मध्यरात्री सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही भागात तुरळक तर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, जांभूळ व्यापाऱ्यांना चिंतेचा सावट आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचे परिणाम आंबा, काजू, जांभूळ आदी पिकावर दिसून येऊ शकतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल कुडाळ कणकवली नांदगाव वैभववाडी तर आंबोली या परिसरात पाऊस पडला सद्यस्थिती तापमानात बरीच वाढ झाली असून दिवसभरात ३४ ते ३६ सेल्सिअस एवढे तापमान आहे दिनांक ८, ९ आणि १० एप्रिल रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाची पावसाची शक्यता असून ११ एप्रिल रोजी पर्जन्यमान कोरडे राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे.
रोहन नाईक, कोकण नाऊ, सिंधुदुर्ग