डेगवेतील विजय देसाई यांची शिवसेनेच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती
डेगवे (ता.सावंतवाडी) ग्रामपंचायतीचे युवा सदस्य विजय शंभा देसाई यांची शिवसेनेच्या इन्सुली उपविभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यातआली.तसे पत्र शिवसेना प्रवक्ते तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना दिले.
त्यावेळी जिल्हा प्रमुख श्री.अशोक दळवी,महिला जिल्हा प्रमुख ॲड.नीता सावंत-कविटकर, सावंतवाडी तालुका प्रमुख नारायण राणे,उपतालुका प्रमुख मंगलदास देसाई व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार व वीस टक्के राजकारण व ऐशी टक्के समाजकारण या ब्रिदानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना वाढीसाठी प्रामाणिक काम करेन अशी प्रतिक्रिया श्री.देसाई यांनी दिली.
श्री देसाई शिवप्रेमी आहेत .त्यांनी श्री साई समर्थ ट्रक चालक-मालक संघटनेचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे.त्यांच्या निवडीनंतर डेगवे पंचक्रोशीतील अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.
प्रतिनिधी, कोकण नाऊ, दोडामार्ग