मुंबई गोवा महामार्गावर टेम्पोचा अपघात ; सिंधुदुर्ग आरटीओ च्या वायू वेग पथकाची शीघ्र कार्यवाही

मुंबई गोवा महामार्गावर आज बेळ नदिपूलावर टेम्पो घसरून कठड्याला आदळला होता. या अपघातामुळे वाहतुकीस अडथळा होत होता. ऐन गणेशचतुर्थी सणाच्या पूर्वसंध्येला झालेल्या या अपघाताने वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबत माहिती मिळताच सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाने तात्काळ घटनास्थळी पोचून ओ
अपघातग्रस्त टेम्पो क्रेनद्वारे बाजूला केला. त्यामुळे नॅशनल हायवेवरील वाहतूक सुरळीत झाली.सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या या तात्काळ कार्यवाहिबद्दल समाधान व्यक्त होत आहे.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण





