गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आचरा येथे पोलीस संचलन

गणेश चतुर्थी आणि इद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी ,याकाळात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यादृष्टीने आचरा येथे पोलीस निरीक्षक प्रदिप पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली आचरा बाजारपेठ ते आचरा तिठा दरम्यान पोलीस संचलन करण्यात आले. यात आचरा पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, मिलिंद परब,तुकाराम पडवळ,मनोज पुजारे,यांसह अन्य पोलीस कर्मचारी, होमगार्ड सहभागी झाले होते.

error: Content is protected !!