हळवल फाट्यावर कार पलटी होत अपघात

कार मधील दोघेजण गंभीर जखमी

गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कार वरील नियंत्रण सुटल्याने या कारमधील तिघांपैकी दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना कणकवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात महामार्गावर हळवल फाट्यानजीक घडला. कारचालक हा सुसाट वेगाने आल्याने हळवल येथील अवघड वळणावर त्याचे कार वरील नियंत्रण सुटून कार तेथील संरक्षण गार्ड ला आदळली. व ती हळवलच्या दिशेने येऊन महामार्गावर पलटी झाली. या अपघातामुळे कारमधील तिघांपैकी दोघांना तातडीने कणकवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर एका ला मुका मार लागला आहे . कारचालक हा वेगाने आल्याने त्याची नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती येथील प्रत्यक्ष दर्शनी दिली. अपघातानंतर तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!