परिश्रमातून मिळवलेले यश ही विद्यार्थ्यांची खरी ओळख

भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ

वेळेचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश दूर नाही. परिश्रमातून मिळवलेले यशच तुमची खरी ओळख बनते. अभ्यासात सातत्य आणि आईवडीलांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानेच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करू शकलो असे प्रतिपादन सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, सिंधुदुर्गचे अधीक्षक अमोल वारघडे यांनी केले.
परमहंस भालचंद्र महाराज शैक्षणिक मंडळाच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ रविवारी संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांच्या अध्यक्षतेखाली व सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक अमोल वारघडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी संस्थानचे खजिनदार दादा नार्वेकर, सेक्रेटरी निवृत्ती धडाम, विश्वस्त प्रसाद अंधारी, गजानन उपरकर, काशिनाथ कसालकर, नागेश मुसळे, संस्थानचे व्यवस्थापक विजय केळूसकर, प्रा. दिवाकर मुरकर, शैक्षणिक सल्लागार शरद हिंदळेकर व शैक्षणिक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गेल्या 40 वर्षापासून सातत्याने संस्थानचे शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू आहेत. आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी या वर्गाचा लाभ घेतला आहे. आपणही या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेवून शिष्यवृत्ती परीक्षेत भाग घेवून तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तुंग यश संपादन करून आपल्या आईवडीलांचे नाव उज्जल करावे असे आवाहन केले. शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष गजानन उपरकर यांनी मंडळाच्या कार्याचा आढावा घेवून तपशिलवार नियोजन सादर केले. यावेळी सरीता पवार, रामचंद्र डोईफोडे यांनी मनोगत व्यक्त केले तर निवृत्ती धडाम, विजय केळूसकर, दिवाकर मुरकर यांनीही मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन सुहास आरोलकर, प्रास्ताविक सदानंद गावकर तर आभार विष्णू सुतार यांनी मानले. प्रकाश परब, शरद हिंदळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे सदस्य मंगेश तेली, श्रीकृष्ण कांबळी, किरण कोरगावकर, रावजी परब व संस्थान कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!