केंद्र शाळा साळिस्ते न.१ व शाळा साळिस्ते कांजिरवाडी नं २ येथे शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले वह्या वाटप

कट्टर राणे समर्थक विजय घरत व माजी ग्रा. पं, सदस्य मयुरेश लिंगायत यांच्या सौजन्याने कार्यक्रम संपन्न

कट्टर राणे समर्थक,मलबार हिल समन्वयक, माजी शाखा प्रमुख विजय घरत यांच्या सौजन्याने व माजी ग्रामपंचायत सदस्य मयुरेश लिंगायत यांच्या पुढाकाराने साळिस्ते येथे केंद्र शाळा साळिस्ते न.१ व शाळा साळिस्ते कांजिरवाडी नं २ येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच प्रभाकर ताम्हणकर, उपसरपंच जितेंद्र गुरव, गाव प्रमुख बाळासाहेब पाटील, ग्रामपंचायत सदस्य मंगेश कांबळे, पोलिस पाटील गोपाळ चव्हाण, माजी सरपंच राधाबाई गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर ताम्हणकर शाळा न.१, व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र गुरव शाळा नं २ दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना मंगेश कांबळेयांनी दोन्ही शाळा या तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर प्रगती करत असताना या शाळांमध्ये भौतिक गरजा व कंपाउट वाॅलचे प्रश्न गेली कित्येक वर्षे अपूर्ण आहे यासंदर्भात पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन संबंधित प्रश्न मार्गी लावू असे. आश्वासन दिले. त्याचप्रमाणे विजय घरत यांचे दोन्ही शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.

error: Content is protected !!