वैभववाडी चेक नाक्यावर गोवा बनवण्याच्या दारू ने भरलेला ट्रक जप्त

वैभववाडी गोवा बनावटी दारूचा भरलेला ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई करूळ चेक नाक्यावरती रविवारी रात्री मध्यरात्री सोमवारी पहाटेच्या सुमारास रात्री ३.३० वाजता वैभववाडी पोलिसांनी दारूने भरलेला ट्रक जप्त केला आहे. ट्रक मध्ये भरून दारू असल्याने दारूच्या बॉटल मोजण्याचे काम सुरू आहे.

करूळ चेक नाक्यावर एमएच ०९ सीव्ही ६२६२ हा ट्रक आला. हा ट्रक कोल्हापूरच्या दिशेने जात होता. तपासणीसाठी करुळ पोलीस तपासणी नाक्यावर ड्युटीवर असलेले पोलीस अजय बिल्पे व हरीश जायभाय यांनी ट्रक थांबवला. यावेळी ट्रकमध्ये काय असल्याचे विचारना पोलिसांनी चालकाकडे केली. दरम्यान चालक याने उडवा उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी ट्रकच्या हौद्यात पाहिले असता संपूर्ण ट्रक भरून दारू असल्याचे व त्यावरती ताडपत्री अंथरल्याचे लक्षात आले. पोलीस अजय बिल्पे यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीस ठाणे वैभववाडी यांना दिली. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, फक्रुद्दीन आगा, सुरज पाटील, संदीप राठोड हे तात्काळ करूळ चेक नाक्यावरती दाखल झाले. गाडीचा पंचनामा करण्यात आला आहे. परंतु ट्रक करूळ चेक नाक्यावरतीच बंद पडला. काही वेळाने बंद पडलेला ट्रक सुरू करून वैभववाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आला. दारुच्या बाटल्या व बॉक्स मोजण्याचे काम सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास वैभववाडी पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!