दिविजा वृद्धाश्रम मार्फत विविध शिबीर संपन्न..

डोळे तपासणी शिबीर,दंत चिकित्सा शिबीर,आरोग्य शिबीरांचा समावेश
दिविजा वृद्धाश्रम विविध सामाजिक कार्यक्रम राबवत असते.समाजातील गोर-गरीब जनतेसाठी सामाजिक कार्य करणारी कोकणातील एकमेव संस्था आहे.वृद्धाश्रम मार्फत शालेय मुलांसाठी विविध कार्यक्रम राबविले जातात.सामाजिक उपक्रमाबरोबरच ग्रामीण भागातील गोर-गरीब जनतेसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.त्यातील काही उपक्रम म्हणजे डोळे तपासणी शिबीर,दंत चिकित्सा शिबीर,आरोग्य शिबीर राबविले जातात.
दिनांक ०४ जुलै २०२५ रोजी समता फाउंडेशन मार्फत दिविजा वृद्धाश्रमात डोळे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले .या शिबिरा मध्ये समता फाउंडेशनचे तर्फे डॉ.मारुती सावंत व त्यांचे सहकारी श्री नितीश शेट्ये यांनी आजी आजोबांच्या डोळ्यांची तपासणी केली तसेच या शिबिरामध्ये ज्या आजी आजोबांना मोतीबिंदु तपासणी निदर्शनास आले त्यांना ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला .या शिबिरामध्ये एकूण ६० आजी आजोबांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली.
११ जुलै ते १३ जुलै २०२५ रोजी दिविजा वृद्धाश्रम व डॉ किसन गारगोटे व त्यांचा पुत्र डॉ कृतीक गारगोटे यांच्या संयुक्त विद्यामाने कोकणातील गोर गरीब जनतेसाठी फिरता दंत चिकीत्सक शिबिराचे आयोजन केले गेले .त्यामध्ये दात साफ करणे,दाताचे फिलिंग करणे,दात काढणे,रूट कॅनल,कवळी बसवणे, दातांचे एक्सरे असे उपचार गोर गरीब जनतेसाठी मोफत केले गेले .जुलै महिन्यात कणकवली तालुक्यातून असलदे दिविजा वृद्धाश्रम४० आजी आजोबांनी ,माध्यमिक शिक्षण शाळा कोळोशी हडपिड येथील १४० विद्यार्थी व शिक्षकांनी ,कोळोशी ग्रामपंचायत ६० ग्रामस्थ तर उर्दू शाळा नांदगाव येथे ६० ग्रामस्थानी मोबाईल दंत चिकित्स शिबिराचा लाभ घेतला आले.३ दिवसात जवळ जवळ ३०० जणांनी याचा फायदा घेतला.
ह्या फिरत्या दवाखान्यात ३०० रुग्णांनी दातांची तपासणी केली गेली. त्यातील ७० रुग्णांचे दात काढण्यात आले.३० रुग्णांचे दात साफ करण्यात आले.४० जणांचे फिलिंग करण्यात आले तर ३० रुग्णांच्या दाताचे एक्सरे काढण्यात आले. तर उर्वरित १३० जणांचे तपासणी करून त्यांना मार्ग दर्शन करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजवंत लोकांना दाताचे उपचार त्याच्या गावात मोफत होऊ लागल्याने त्यांच्या ही चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद व्यक्त होत होता.
दिनांक १५ जुलै २०२५ रोजी आरोग्य मार्गदर्शन शिबीराचे दिविजा वृद्धाश्रम मध्ये आयोजन करण्यात आले.आयुर्वेदिक पद्धतीने आजाराचे उपचार कसे करावे याचेमार्गदर्शन करण्यात आले व सर्व आजी आजोबांची मोफत तपासणी करण्यात आली.
डॉ,प्रणय मालंडकर श्री मनीष जवले,श्रीम वैशाली शिंदे यांनी आरोग्य मार्गदर्शन शिबीर घेऊन आजी आजोबांना मधुमेह,बी.पी,हृदयाचे आरोग्य हाडांचे आरोग्य,जॉइंट हेल्थ त्वचा,स्कीन चे आरोग्य वजन कमी/वाढवायचे अशा त्रासांवर आधारित आजी आजोबांना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच आजी आजोबांना मार्गदर्शन करून आजी आजोबांचे जनरल चेकअप केले.