खारेपाटण बीट मधील पोलीस पाटील यांचा स्नेहमेळावा संपन्न…

पी एस आय -रवींद्र पन्हाळे यांची प्रमुख उपस्थिती

खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या पोलीस बिट मधील पोलीस पाटील यांचा स्नेहमेळाव्याचा कार्यक्रम कणकवली पी एस आय- रवींद्र पन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खारेपाटण पोलीस दूरशेत्र कार्यालयात नुकताच उस्ताहात संपन्न झाला.
यावेळी खारेपाटण विभागातील पोलीस पाटील यांच्या वतीने पी एस आय श्री रवींद्र पन्हाळे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ विशेष सत्कार करण्यात आला.तर खारेपाटण पोलीस दूरशेत्रा करीता येथे नव्याने रुजू झालेले पोलीस अंमलदार श्री मिलिंद देसाई व श्री अवधूत गुनिजन यांचा देखील पोलीस पाटील सहकाऱ्यांच्या वतीने चिंचवली गावचे पोलीस पाटील श्री दिगंबर भालेकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खारेपाटण पोलीस दूरशेत्रात काम केलेले व सद्या बदली होऊन वैभववाडी पोलीस ठाणे येथे रुजू झालेले खारेपाटण चे माजी पोलीस अंमलदार श्री उद्धव साबळे व श्री चंद्रकांत माने यांचा देखील पोलीस पाटील यांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या स्नेहमेळावा कार्यक्रमाला चिंचवली गावचे पोलीस पाटील श्री दिगंबर भालेकर,खारेपाटण संभाजी नगर गावचे पोलीस पाटील ओमकार चव्हाण,खारेपाटण शिवाजी पेठ गावचे पोलीस पाटील श्री अनिकेत जामसंडेकर,शेर्पे पोलीस पाटील श्री विनोद शेलार,कुरंगवणे पोलीस पाटील श्री देवेन गोसावी,बेर्ले पोलीस पाटील श्री रतन राऊत, नडगिवे पोलीस पाटील श्री जितेंद्र मण्यार,साळीस्ते पोलीस पाटील श्री गोपाळ चव्हाण,वारगाव पोलीस पाटील श्री दिलीप नावळे शिडवणे पोलीस पाटील श्री समीर कुडतरकर,वायंगणी पोलीस पाटील श्री निलेश कदम आदी उपस्थित होते.
यावेळी पी एस आय श्री रवींद्र पन्हाळे यांनी उपस्थित सर्व पोलीस पाटील यांना आपली कर्तव्ये व जबाबदारी या विषयी छान मार्गदर्शन केले.तर स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनाचा देखील उपस्थित पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी व पोलीस पाटील कर्मचारी यांनी लाभ घेतला.

error: Content is protected !!