संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग च्या अध्यक्षपदी महेश परुळेकर यांची बिनविरोध निवड

कार्याध्यक्षपदी रमाकांत जाधव, महासचिव गौतम खुडकर व जिल्हा संघटक पदी अंकुश जाधव यांची निवड

जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन करू पाहत आहेत यात सर्वांनी सहभागी होऊया असे आवाहन

जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन, यात सर्वांनी सहभागी होऊया

सिंधुदुर्गातील संविधानिक हितकारिणी महासंघ सिंधुदुर्ग ची महत्वाची सभा कुडाळ रेस्ट हाऊस येथे नुकतीच संपन्न झाली. ही सभा जेष्ठ आंबेडकरी चळवळीतील नेते आणि रिपब्लिकन पार्टी चे (आठवले गट) राज्य सहसचिव रमाकांत जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व बसपा चे जेष्ठ नेते तथा जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर, समाजभूषण पुरस्कार प्राप्त व बौद्ध महासभेचे नेते प्रभाकर जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश परुळेकर, कार्याध्यक्षपदी रमाकांत जाधव, महासचिव गौत्तम खुडकर व जिल्हा संघटक पदी अंकुश जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकारिणी ही गठीत करण्यात आली
सभेची सुरुवात माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सर्वांचे स्वागत करून केली. सभेचे अध्यक्ष स्थान जेष्ठ नेते रमाकांत जाधव यांनी स्वीकारावे असे पत्रकार शंकर जाधव यांनी सुचविले त्याला विश्वनाथ पडेलकर (भाजपा अध्यक्ष देवगड )यांनी अनुमोदन दिले.
त्यानंतर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सभा सुरु. मागील सभेचे इतिवृत्त वाचन गौत्तम खुडकर माजी नगरसेवक कणकवली यांनी केले. त्यावर काही सूचना आल्या नाहीत असं मत ऍड मठकर यांनी वक्त केल. त्यात दुरुस्त करून इतिवृत्त कायम करत सभागृहात मंजुरी देण्यात आली. महासंघाला विश्वस्त मंडळ की कार्यकारी अध्यक्ष मंडळ हवं विषय सभागृहात चर्चेत ठेवला. यावर उपस्थितांनी खूप अभ्यासपूर्ण मांडणी करत चर्चा केली. सर्वानुमते कार्यकारी अध्यक्ष मंडळ असायला हवे. तसेच एक कोअर कमिटी स्थापन करावी. सर्व अधिकार कोअर कमिटीला देण्यात यावे व त्यांचेच मार्गदर्शन आणि निर्णया नुसार अध्यक्ष व कार्यकारिणी यांनी काम करेल असं ठरविण्यात आले. कार्यकारिणी एक वर्षासाठी असेल असेही घोषित केले.
सभेला वंचित बहुजन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, समाजभूषण पुरस्कार प्राप्त तथा बौद्ध महासभेचे नेते प्रभाकर जाधव, माजी नगरसेवक गौत्तम खुडकर,नगरसेवक ऍड.विलास कुडाळकर, ऍड. एस. के. चेंदणनकर, विजय कदम,पत्रकार शंकर जाधव, आनंद देवगडकर, दिलीप वाडेकर, विश्वनाथ पडेलकर,जयंत जाधव, सखाराम जाधव, वामन कांबळे,दुलाजी चौकेकर, ऍड. नामदेव मठकर,ऍड. एस. व्ही. कांबळे,वासुदेव जाधव, संदेश कदम,सचिन जाधव, बाळा जाधव, विष्णू तेंडोलकर, विनोद कदम,सत्यवान तेंडोलकर, मंगेश गावकर,देवदत्त कदम, के. एस. कदम,संदीप जाधव, चंद्रकांत वालावलकर,आनंद धामापूरकर,केशव जाधव,सुधीर अणावकर,चंद्रकांत म्हापणकर,सरपंच सुशील कदम,सुशील जाधव, तुषार जाधव आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व निमंत्रक उपस्थित होते.
यावेळी महासंघाची घटना व कार्यक्रम यावर विस्तृत चर्चा करण्यात आली. महासंघ मसुदा समिती गठीत केली. सभाध्यक्ष जाधव यांनी सभा हाताळत प्रत्येकाला बोलण्याची संधी देत मते जाणून घेतली.जेष्ठ नेते व बसपा चे जिल्हाध्यक्ष पी. के. चौकेकर यांनी आपण जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक नसल्याचे सभागृहात जाहीर केले. तसेच हा महासंघ जिल्ह्यात विकासात्मक परिवर्तन करू पाहत आहेत यात सर्वांनी सहभागी होऊया असे आवाहन केले.
महेश परुळेकर व अंकुश जाधव यांनी समाजाचाचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार आयोजित करूया.एकाच मंचावर अनेक प्रश्न शासनाचे प्रतिनिधी म्हूणन पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत सुटू शकतील. यासाठी प्रयत्न करूया. पालकमंत्री नामदार राणे यांची वेळ घेऊन जनता दरबार घेऊया. समाज हितासाठी आवश्यकता असेल तिथे लोकांप्रतिनिधी यांची मदत घेऊया,संघर्ष करायचा गरज असेल तिथे संघर्ष करून रस्त्यावर उतरू. पण सुसंवाद साधून प्रश्न सुटत असतील तिथे तर संवाद साधुया. पालकमंत्री राणे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या जनता दरबारा साठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया व खऱ्या अर्थाने समाज जोडूया असे आवाहन केले. सभाध्यक्ष जाधव यांनी सभेचा समारोप करत असताना महासंघाची भूमिका स्पष्ट केली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निळ्या झेंड्या खाली सर्वांनी एकत्रित येऊन काम करूया. आपण या ऐतिहासिक घटनेचे भागीदार आणि साक्षीदार होत आहोत. या पूर्वी असा प्रयोग झाला नव्हता पण आपल्या सर्वांच्या पुढाकारने आणि आग्रही भूमिका यामुळे च हा महासंघ निर्माण झाला आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांचे नाव सभागृहात खूप वेळ चर्चेत आलं आणि त्यांनी स्वीकारावं अशी आग्रही भूमिका बऱ्याच जणांनी मांडली. पण जाधव यांनी पदापेक्षा आपल्याला समाजहित आणि समाज जोडो हे खूप महत्वाचे वाटत आहे म्हूणन त्यांनी नम्र पणे आलेली संधी नाकारत महेश परुळेकर यांना जिल्हाध्यक्ष पदी यांना संधी द्या असं जाहीर केल. आपणही या शर्यतीत नाही आहे.त्यामुळे परुळेकर यांची एकमताने जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे आपण घोषित करत आहोत असे जाधव सर यांनी सभागृहात अध्यक्षीय भाषण करताना स्पष्ट केले.
महासंघ जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे
जिल्हा उपाध्यक्ष – विजय कदम,ऍड.एस. के. चेंदवणकर,विश्वनाथ पडेलकर, के. एस. कदम,वासुदेव जाधव,चंद्रकांत म्हापणकर, सुशील कदम, शंकर जाधव
जिल्हा सचिव -संदीप जाधव,बाळा जाधव,सत्यवान तेंडोलकर,ऍड. विलास कुडाळकर,दिलीप वाडेकर, आनंद देवगडकर.
जिल्हा कोषाध्यक्ष -अर्जुन आयनोडकर सहकोषाध्यक्ष – देवदत्त कदम.
कायदेशीर सल्लागार – ऍड. नामदेव मठकर, ऍड, एस. व्ही. कांबळे.
सदस्य -महासंघ सर्व निमंत्रक.

error: Content is protected !!