खारेपाटण जि.प.केंद्र शाळा क्र.१ ची विद्यार्थीनी कु.विभा धुमाळे हिचे नवोदय परीक्षेत सुयश

शाळेच्या वतीने करण्यात आला सत्कार
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण क्र.१ या शाळेची इयत्ता ६ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थीनी कु.विभा गिरीश धुमाळे हिने नुकतीच केंद्रीय स्तरावर शालेय विद्यार्थ्यासाठी घेण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालय स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले असून नुकताच तिचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खारेपाटण सरपंच सौ प्राची ईसवलकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ प्राप्ती कट्टी, शाळेचे उच्च श्रेणी मुख्याद्यापक श्री प्रदीप श्रावणकर ज्येष्ठ सेवानिवृत्त शिक्षिका श्रीम.स्मिता कोरगावकर,
शाळेच्या पदवीधर शिक्षिका श्रीम शीतल राठोड,शिक्षक श्री मिलिंद सरकटे,उपशिक्षिका श्रीम अलका मोरे,श्रीम.आरती जोजेन,श्रीम. समिधा राऊत,श्रीम.अबिदा काझी, श्री धुमक सर आदी उपस्थित होते.
खारेपाटण केंद्र शाळेची विद्यार्थीनी कु.विभा धुमाळे हीची सांगेली ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग येथील जवाहर नवोदय विद्यालयात निवड झाली असून खारेपाटण केंद्र शाळेत नुकताच तिचा गावच्या सरपंच सौ प्राची ईसवलकर व शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर यांचे शुभहस्ते शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.तर तिला नवोदय परीक्षेसाठी मार्गदर्शन करणाऱ्या शाळेच्या शिक्षिका श्रीम समिधा राऊत व श्रीम.आरती जोजेन यांचा देखील शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
“खारेपाटण केंद्र शाळा ही राज्यातील आदर्श शाळा तथा मॉडेल स्कूल असून या शाळेची विद्यार्थीनी कु.विभा धुमाळे हीची नवोदय सारख्या केंद्रीय परीक्षेत निवड झाली ही बाब आमच्या गावासाठी भूषणावह आहे.तिच्या यशामुळे खारेपाटण केंद्र शाळेने पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली असून तिने शाळे बरोबरच गावचे नाव देखील उज्ज्वल केले असल्याचे भावपूर्ण उदगार सरपंच सौ प्राची ईसवलकर यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी शाळेचे शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी कु.विभा धुमाळे हिचे अभिनंदन करून तिला तिच्या पुढील शैशनिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांनी मानले.