तलाठी विकास चाळके झाले पोलिस उपनिरीक्षक

खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने चाळके यांचा करण्यात आला विशेष सत्कार

कणकवली तालुक्यातील नडगीवे गावचे तलाठी विकास चाळके हे नुकतेच पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्याने खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने चाळके यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी खारेपाटण सरपंच -प्राची इस्वलकर, उपसरपंच-महेंद्र गुरव, खारेपाटण तलाठी-लुडबे, ग्रामपंचायत सदस्य-क्षितिजा धुमाळे,
मनाली होनाळे, दक्षता सुतार, अस्थाली पवार, अमिषा गुरव,गुरुप्रसाद शिंदे,जयदीप देसाई, सुधाकर ढेकणे, किरण कर्ले, व सर्व सदस्य तसेच ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
विकास चाळके हे नडगीवे या गावी ऑगस्ट -2024 मध्ये तलाठी म्हणून रुजू झाले.तलाठी या सेवेत असताना आपले कर्तव्य पार पाडत नागरिकांना उत्तम सेवा देत.त्याचा एम. पी. एस. सी. चा पोलीस उपनिरीक्षक चा अभ्यास देखील सुरु होता.त्यांचे मूळ गांव कोदळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा. आणि शिक्षण शिक्षण; मेकॅनिकल इंजिनीअरींग डिप्लोमा व बी.ए.(राजकारण शास्त्र व इतिहास) असे झाले आहे.विकास चाळके यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्यांचा खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.25मार्च रोजी हा परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्यात विकास चाळके यांनी यश संपादन केले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतं आहे.

error: Content is protected !!