कनेडी शिक्षण संस्थेचे संचालक संदेश सावंत यांचा वाढदिवस कनेडी हायस्कूल मध्ये साजरा

कै सुधीर सावंत यांच्या स्मरणार्थ वर्ग खोली साठी दहा लाख रुपये ची देणगी जाहीर
कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे संचालक माजी जि प अध्यक्ष संदेश सावंत यांचा 51 वा वाढदिवस प्रथमच कनेडी हायस्कूल च्या न्यानदीप सभागृहात संस्थेच्या वतीने साजरा करण्यात आला वाढदिवस निमित्ताने संदेश सावंत यांनी आपण या शाळेचा माजी विध्यार्थी आहे या शाळेच्या, संस्थेची प्रगती व्हावी विध्यार्थ्यांना चांगल शिक्षण मिळाव यासाठी ही संस्था ताब्यात घेण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता माझ्या आयुष्यात मी ठरवलेलं आहे शिक्षण क्षेत्र व धार्मिक क्षेत्रात राजकारण करणार नाही परंतु संस्थेन मी पणा न आणता आम्ही म्हणून काम केल्यास यापुढेही संस्थेच्या हितासाठी काम करणार असल्याची ग्वाही दिली संदेश सावंत यांनी आपले बंधू कै सुधीर श्रीधर सावंत यांच्या स्मरणार्थ एक वर्ग खोली बांधण्यासाठी दहा लाख रुपये देण्याची घोषणा केली या वाढदिवस कार्यक्रमाला संस्थेचे सरचिटणीस शिवाजी सावंत, संचालक संजय सावंत, व्ही बी सावंत सर, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण जेष्ठ ग्रामस्थ मनोहर सावंत, रमेश सावंत, संतोष सावंत श्रीकांत सावंत मिलिंद बोभाटे विलास सावंत शिक्षक विध्यार्थी पालक्वर्ग उपस्थित होते