कणकवली नगरपंचायत आयोजित योग प्रशिक्षण कार्यक्रमास उस्फूर्त प्रतिसाद

15 दिवसाच्या मोफत योग शिबिराचे करण्यात आले आहे आयोजन

             कणकवली नगरपंचायत महिला बालकल्याण विभागाच्यावतीने कणकवली शहरातील युवती व महिलांसाठी 15 दिवसीय मोफत योग प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते . सदर कार्यक्रमाची आज दिनांक 1 एप्रिल 2025 रोजी सांगता करण्यात आली. सदर समारोप कार्यक्रमा वेळी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करत पुढे देखील योग चालू ठेवण्याचा निर्धार केला व अश्या प्रकारच्या नावीन्यपूर्ण प्रशिषण घेऊन त्यात सहभागी करून घेतल्याबद्दल नगर पंचायतचे आभार मानले. सदर योग कार्यशाळेस योग प्रशिक्षक म्हणून श्री.आनंद सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. 

योग हा मानवी जीवनातील निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली असून नेहमीत योग केल्यास व्याधी मुक्त, उत्साही जीवन जगात येत याचाअनुभव 15 दिवशीय योग प्रशिषणात उपस्थित महिलांनी घेतला. भविष्यातही अश्या प्रकारची नावीन्य पूर्ण व उपयुक्त प्रशिषणाचे आयोजन करण्यात यावे. असे सांगितले. या कार्यक्रमात 18 वर्ष वयापासून 70 वर्षा पर्यत च्या सर्व वयोगटातील महिलांनी उस्फुर्त सहभाग घेत जीवनात योग किती आवश्यक आहे सांगितले. या 15 दिवसाच्या योग प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या 60 वर्षावरील 06 महिलांना कणकवली नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष मा.समीरजी नलावडे यांच्यावतीने भेटवस्तू देण्यात आली. तसेच सहभागी झालेल्या सर्व महिलांना कणकवली नगरपंचायतीच्यावतीने 15 दिवसीय योग प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले. सदर सांगता कार्यक्रमास मा.मुख्याधिकारी श्रीम.गौरी पाटील, योग प्रशिक्षक श्री.आनंद सावंत, सहा.प्रकल्प अधिकरी श्री.अमोल भोगले, प्रशासकीय अधिकारी, श्री.अमोल अघम, ध्वजा उचले, निकिता पाटकर, अस्मिता चव्हाण, ज्योती देऊलकर व रूचीता ताम्हणकर इत्यादी उपस्थित होते.

error: Content is protected !!