खारेपाटण येथील राष्ट्रीयकृत बँकांच्या नेटवर्क समस्येने नागरिक त्रस्त

“बँकेच्या कारभारात सुधारणा न केल्यास निषेध मोर्चा काढणार…– श्री रमाकांत राऊत
कणकवली तालुक्यातील खारेपाटण गावातील राष्ट्रीयकृत मान्यता असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा – खारेपाटण च्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहक वर्ग तसेच नागरिक त्रस्त झाले असून याचा फटका वृद्ध ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्ग आणि व्यापारी आणि शालेय विद्यार्थ्यांना बसत आहे.
याबाबत नुकतेच खारेपाटण गावचे माजी सरपंच तथा भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रामाकांत राऊत शिवसेना शिंदे गट कणकवली उपतालुका प्रमुख श्री मंगेश गुरव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख श्री महेश कोळसुलकर सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पाटणकर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खारेपाटण चे व्यवस्थापक श्री गणेश शिवथरे यांनी भेट घेऊन ग्राहकांच्या होत असलेल्या गैरसोयी बद्दल जाब विचारला.
खारेपाटण येथील दोन्ही राष्ट्रीय कृत बँकेकडून ग्राहकांची अक्षरशः पिळवणूक केली जात असून बँकांच्या या गलथान कारभाराला स्थानिक नागरिक व ग्राहक कंटाळलेले असून बँकेने आपल्या सेव्हमध्ये तातडीने सुधारणा न केल्यास ग्रामस्थ व ग्राहकांच्या वतीने बँकेच्या व्यवस्थापना विरोधात जाहीर निषेध मोर्चा काढण्यात येईल असे देखील श्री रमाकांत राऊत यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान खारेपाटण येथील स्टेट बँक शाखेच्या देखील कारभारात सुधारणा करण्यात येण्यासाठी येथील सकल मराठा बांधवांच्या वतीने विद्यमान शाखा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते.मात्र याबाबत देखील बँक व्यवस्थापनात काहीच सुधारणा झालेली नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे असून आता आंदोलना शिवाय पर्याय नाही असे पंचक्रोशीतील ग्रमस्थांचे म्हणणे आहे.
खारेपाटण येथे शनिवार हा आठवडा बाजाराचा दिवस असल्यामुळे ग्रहकमा पैशांची गरज असते.अशावेळी देखील नेटवर्क नसल्यामुळे ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे.तर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत बरेच ग्राहक हे मुंबई महानगर पालिका सेवेतील सेवानिवृत्त पेन्शनधारक ज्येष्ठ महिला पुरुष हे आजूबाजूच्या दशक्रोशितील गावातील नागरिक असून बँकेत पेन्शन काढायला आल्यानंतर केवळ नेटवर्क नसल्यामुळे त्यांना पेन्शन न मिळता परत जावे लागत आहे.
याबाबत बँक ऑफ महाराष्ट्र गोवा रिजनल ऑफिसर न खारेपाटण मध्ये दि.२६ जानेवारी २०२५ पर्यंत बोलवून घ्या.असे अल्टिमेट बँकेला देण्यात आले असून अन्यथा २७ जानेवारी २०२५ ला ग्रामस्थांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्याचा इशारा खारेपाटण गावचे माजी सरपंच श्री रमाकांत यांनी बँक व्यवस्थापनाला दिला आहे.