विकी अलोक राणा हे गोवा बिचोलिम येथील निराधार बांधव संविता आश्रमात दाखल.

गोवा बिचोलिम येथे रस्त्यावर निराधार जीवन जगत असलेले विकी अलोक राणा या बांधवांस नुकतेच जीवन आनंद संस्थेच्या पणदूर तालुका कुडाळ येथील संविता आश्रमात दाखल करण्यात आले.
विकी राणा हे बांधव गोव्यातील बिचोलिम येथे गेले काही दिवस रस्त्याच्या बाजूला निराधार आणि बेघर जीवन जगत असल्याचे बिचोलिम नगरपालिकेचे नगरसेवक चंदन सर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी यांविषयी जीवन आनंद संस्थेचे संदिप परब यांना माहिती दिली.
संदिप परब यांनी याबाबत तात्काळ दखल घेवून विकी राणा यांना सहकाऱ्यांच्या मदतीने व बिचोलिम पोलीस स्टेशनच्या पत्राद्वारे संस्थेच्या पणदूर येथील संविता आश्रमात दाखल केले. यावेळी संदिप परब, प्रसाद आनगणे व गोपाल पालव हे उपस्थित होते.
विकी राणा हे बांधव बांधकाम व्यवसायाला पुरक असणारे वेल्डिंगचे काम करीत असत मात्र त्यांना पॅरॅलिसिस चा आजार झाल्याने…रोजगाराअभावी कालांतराने रस्त्यावरचे निराधार व सर्व दृष्टीने वंचिततेचे जीवन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली.
जीवनाच्या प्रतिकूल परिस्थितीत विकी यांना संविता आश्रमात जीवन आधार मिळाला असून लवकरच ते पाहिल्यासारखे बरे होतील. समाजात कोणीलाही निराधार व बेघर जीवन जगावे लागू नये. असे ब्रीद घेवून जीवन आनंद संस्था गेली 11 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहे