जेईई परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविलेल्या अनुजा देसाईचा माजी नवोदय अलुमनी असो . सावंतवाडीच्या वतीने विशेष सत्कार.

        अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर मात करून जेईई सारख्या कठीण परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवलेली दोडामार्ग ,हेवाळे गावची सुकन्या आणि सांगेली नवोदय विद्यालयाची विद्यार्थीनी अनुजा मनोहर देसाई हिने संपूर्ण देशात सिंधुदुर्गचे नाव उज्ज्वल केले आहे.
       यापूर्वीही अनुजा दहावी,बारावी ,सी.एस.आर.एल, आय.आय.टी सारख्या परीक्षांत नेत्रदीपक यश संपादन करीत ‘सकुरा सायन्स एक्सचेंज प्रोग्राम ‘च्या माध्यमातून  विज्ञान व तंत्रज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जपानमध्येही जाऊन आली होती. 
      दिवसातील १८ तास अभ्यास करणाऱ्या अनुजाच्या भगीरथ प्रयत्नाने खळाळणारा तीचा हा ज्ञानगंगेचा प्रवाह असाच विस्तारत जाण्यासाठी ,त्याच प्रशालेत शिकून आता विविध पदांवर कार्यरत असलेल्या माजी नवोदय अलूमनी असो .सावंतवाडी येथील माजी विद्यार्थ्यांनी अनुजाची भेट घेऊन  तिचा सत्कार करीत तीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी  डॉ.निर्मला सावंत, परमेश्वर सावळे,मयुरेश राऊळ,अमित लिंगवत,हर्षवर्धन बोरवडेकर,सुनील सोन्सुरकर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!