युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने STS परीक्षेतील २ री व ३ री मधील गुणवंत विद्यार्थी जाणार गोवा सायन्स सेंटर भेटीला

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा 2025 मधील २ री व ३ री इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादी तील प्रथम पाच अशा १० गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात * बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी गोवा सायन्स सेंटर येथे भेटीसाठी घेऊन जाण्यात येणार आहे. या सहली दरम्यान पणजी येथील लायब्ररी आणि पर्यटन स्थळांना भेटीचा आनंद मुलांना देण्यात येणार आहे.
या सहलीचा प्रारंभ बुधवार दिनांक १६ जुलै २०२५ रोजी सकाळी ७:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन होईल.युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा.सौ संजना संदेश सावंत आणि संस्थापक अध्यक्ष मा.श्री संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांच्या संकल्पनेतून या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे या सहलीमुळे शालेय विद्यार्थ्यांना गोवा सायन्स सेंटर सोबतच पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे.
गोवा सायन्स सेंटर सफरी साठी निवड झालेले 2 री 3 री मधील टॉप 5……..
इयत्ता 2 री
1) प्रांजली पाटील 196 एस एम एस हायस्कूल कणकवली
2) राघव गावकर 190 केंद्रशाळा साळशी नंबर 1
3) मानस चव्हाण 188 पेंडूर नंबर 1
4) स्वरूपा मराठे 188 शारदा विद्यालय तुळस कुंभार टेंभ,
5) वेद चव्हाण 186 मुकुंद वासुदेव पाठक प्रायमरी स्कूल जामसंडे,
इयत्ता 3 री
1) शांभवी मोहिते 190 पुरळ कसबा
2) स्वरा शिंदे 188 जामसंडे वाळकुवाडी
3) तन्वी भोसले 188 पीएमसी केंद्र शाळा शिरगाव नंबर 1,
4) ऋषभ जाधव 188 कसाल कुंभारवाडा
5) आराध्य बंड 188 नरडवे कोकेवाडी
* या आधी 11 जून ते 14 जून 2025 या कालावधीत 4 थी, 6 वी व 7 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ईस्त्रो भेटीसाठी घेऊन जाण्यात आले होते.*
पुढील परीक्षा रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आली असून फॉर्म वितरण सुरु झाले आहे…..