प्रणाली मानेसह पती व मुलाला १५ जुलै पर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. उमेश सावंत, ॲड. संग्राम देसाई यांचा युक्तिवाद

सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, पती मिलिंद माने व त्यांचा मुलगा आर्य माने याना अतिरीक्त सत्र न्यायाधिश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी १५ जुलै २०२५ पर्यंत अंतरीम अटकपूर्व जामिन मंजूर केला आहे. संशयितांपैकी प्रणाली व आर्य माने यांच्यावतीने अॅङ उमेश सावंत यांनी काम पाहिले. तर मिलिंद माने यांच्यावतीने अॅङ संग्राम देसाई यांनी काम पाहिले.
दि. ४ जुलै २०२५ रोजी सौ. प्रिया हीने तीच्या राहत्या घराच्या बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत ६ जुलै रोजी तीचे वडिल विलास तावडे रा. कलंबिस्त यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतिय न्याय संहिता कलम १०८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत दोन्ही संशयितांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
त्यावर झालेल्या सुनावणीत ११ जुलैपर्यंत प्रत्येकी २५ हजार रुपयांचा अंतरीम अटकपूर्व जामिन मंजूर करण्यात आला होता.
तर मिलिंद माने यांच्यावतीने गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तसेच याबाबत सरकारी पक्षाकडून म्हणणेही सादर करण्यात आले होते. परंतु शुक्रवारी यावर सुनावणी न झाल्याने पुढील सुनावणी 15 जुलै रोजी होणार आहे. तोपर्यंत तिघांनाही न्यायालयाने सशर्थ अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

error: Content is protected !!