खारेपाटण येथे श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा नर्सिंग कॉलेज व प्लंबिंग टेक्नॉलॉजी कौशल्य प्रशिक्षणाचा शुभारंभ

“आजचा विद्यार्थी आत्मनिर्भर झाला पाहिजे “-अभय मठ
“आजच्या बदलत्या जागतिक परिस्थितीत विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनविले पाहिजे. “असे भावपूर्ण उदगार ज्ञानदा गुरुकुल पुणे या संस्थेचे अध्यक्ष श्री अभय मठ यांनी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा नर्सिंग कॉलेज व प्लंबिंग टेक्नॉलॉजी कोशल्य प्रशिक्षणाच्या शुभारंभप प्रसंगी खारेपाटण हायस्कूल येथे काढले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री राजाराम श्रीपाल कावळे व शाळेच्या माझी विद्यार्थीनी श्रीमती प्रमिला भारती यांच्या शुभहस्ते संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सैनिक गुरुवर्य वीर शंकरराव पेंढारकर सर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने खारेपाटण दशक्रोशीतील विद्यार्थ्यासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संचलित ‘रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण कोर्स ‘व ज्ञानदा गुरुकुल पुणे या संस्थेच्या सहकार्याने प्लंबिंग टेक्नॉलॉजी कोशल्य प्रशिक्षणा कोर्स सुरू करण्यात आले असून या कार्यक्रमाला बांधकाम व्यवसायिक श्री प्रवीण अमृते,डॉ. बलराज येळकोटे,खारेपाटणचे माजी सरपंच श्री रमाकांत राऊत, सामाजिक कार्यकर्ते श्री रुपेश सावंत,श्री मंगेश गुरव,संस्थेचे उपाध्यक्ष श्री भाऊ राणे,सचिव श्री महेश कोळसुलकर, संचालक श्री विजय देसाई,सिनियर कॉलेज प्राचार्य डॉ. ए डी कांबळे,श्री राजेंद्र वरुणकर,मोहन कावळे,दादा कर्ले, दिगंबर राऊत,खारेपाटण हायस्कूल चे मुख्याद्द्यापक श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत,रोटरी क्लब खारेपाटण चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे, उपाध्यक्ष मंगेश ब्रम्हदंडे,श्री किशोर माळवदे,दानशूर व्यक्तिमत्त्व श्री राजाराम कावळे यांचे कुटुंब सदस्य श्री पवन कावळे,सौ प्रवीण कावळे, राहुल कावळे,सौ राणी कावळे आदी मान्यवर उपस्थित होते.
खारेपाटण येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या श्रीमती आशा राजाराम कावळे पॅरा नर्सिंग कॉलेज करीता श्री राजाराम श्रीपाल कावळे व त्यांच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत सुमारे ११ लाख रुपयाची देणगी खारेपाटण शिक्षण संस्थेला जाहीर केली असून त्यांचा या अतुलनीय सामाजिक दातृत्वाचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ व सन्मान चिन्ह देऊन अध्यक्षांच्या वतीने कार्यक्रमात विशेष गौरव करण्यात आला.तर या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचा संस्थेच्या अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे व शाळेचे मुख्याद्यापक श्री संजय सानप यांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
“आजच्या गुरुपौर्णिमेच्या शुभ प्रसंगी संस्थेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या नव्या कोर्स प्रशिक्षण शुभारंभ प्रसंगी आपण सर्वांनी संकल्प करूया शिक्षण शेत्रालाआर्थिक योगदान देऊन विकासाला चालना देऊया असे उदगार यावेळी प्रमुख पाहुण्या व शाळेच्या पहिल्या बॅच च्या माजी विद्यार्थिनी श्रीमती प्रमिला भारती यांनी मार्गदर्शन करताना काढले.
तर खारेपाटण शिक्षण संस्थेच्या वतीने धाडसाने सुरू करण्यात आलेल्या या नव्या कोर्स फायदा येथील दशक्रोशितील विद्यार्थ्याना होणार असून यामुळे युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.संस्थेने विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराच्या दृष्टीने सक्षम बनविण्यासाठी उचललेले हे क्रांतिकारी पाऊल असल्याचे
यावेळी संस्था अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी सांगितले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.कोकाटे मॅडम व श्री वरुणकर सर यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री संजय सानप व प्रमुख पाहुण्यांची ओळख श्री अजय गुरसाळे यांनी करून दिली.तसेच सरांचे आभार शाळेचे शिक्षक श्री सतीश नाईक सर यांनी मानले.