पारिजात संस्थेच्या वतीने शाळा माईण नंबर 1 येथे शैक्षणिक साहित्य वितरण

गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत 20 हजार रुपयांचे शैक्षणिक साहित्याचे वाटप
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माईण नंबर 1 येथे पारिजात संस्था मुंबई च्या सौजन्याने गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून तब्बल 20 हजार रुपये किंमतीचे शैक्षणिक साहित्याचे विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
पारिजात संस्था मुंबई यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना या किटचे वाटप करण्यात आले.ही संस्था दरवर्षीच असे उपक्रम घेत असते. या किटमध्ये चित्रकला वही, लेखन पॅड, लाँगबुक्स ,एकेरी, दुरेघी व चौरेघी 200 पेजीस वह्या, पाऊच, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, रंगपेटी, स्कूलबॅग इत्यादी साहित्याचा समावेश होता .एकूण वीस हजार रुपये किमतीचे हे साहित्य मिळवून देण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष श्री श्रीकृष्ण घाडीगावकर व अध्यक्ष श्री. रंजित घाडीगावकर यांनी पुढाकार घेतला .यावेळी माईण सरपंच श्रीमती नितिशा पाडावे, ग्रामपंचायत सदस्य श्री. पाडावे, श्रीमती आडेलकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रंजित घाडीगावकर,माजी अध्यक्ष श्री. श्रीकृष्ण घाडीगावकर, सावडाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सद्गुरू कुबल ,व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. केंद्रप्रमुख व सरपंच यांनी मनोगत व्यक्त करत पारिजात संस्थेच्या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीमती तावडे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार उपशिक्षिका श्रीमती ऋजुता चव्हाण यानी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपशिक्षिका श्रीमती राधिका सावंत यानी सहकार्य केले.