निवडणुकी संदर्भातील राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण योग्यरित्या पूर्ण केल्याबद्दल सतीश कडू यांचा सत्कार

महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक निवणूक कार्यकारी अधिकारी किरण शार्दूल यांच्या हस्ते प्रशिस्तीपत्रक

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत महाराष्ट्रातुन नोंदविण्यात आलेल्या बि.एल.ओ. आणि पर्यवेक्षक यांच्या दिनांक 3 जुलै ते 4 जुलै दरम्यान IIIDEM दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणात श्री सतीश शांताराम कडू यांनी पर्यवेक्षक म्हणून मुंबई उपनगरातील 152-बोरिवली विधानसभा मतदार संघातर्फे सहभाग नोंदवीला. या कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त श्री. ज्ञानेश कुमार यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमात महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड आणि लडाख या राज्यांचा समावेश होता. प्रशिक्षणाची प्रमुख धुरा हीं उपजिल्हाधिकारी संदीपकुमार अपार, उपजिल्हाधिकारी श्री नितीन हिंगोले व सिंधुदुर्ग मधून उपजिल्हाधिकारी श्री. बालाजी शेवाळे यांनी सांभाळली. योग्य रित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल श्री सतीश कडू यांना महाराष्ट्र राज्याचे सहाय्यक निवणूक कार्यकारी अधिकारी श्री किरण शार्दूल सरांतर्फे प्रशिस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. कार्यकर्माचे सुंदर आणि शिस्तबंद नियोजन तसेच महाराष्ट्रातील सर्व BLO व पर्यवेक्षक यांची काळजी मा. सहाय्यक निवणूक कार्यकारी अधिकारी श्री किरण शार्दूल सरांनी घेतली. या प्रशिक्षणाकरिता श्री सतीश कडू यांना पाठवण्याकरिता मा. जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, बोरिवलीचे तहसीलदार श्री इरेश चप्पलवार, निवणूक नायब तहसीलदार श्री महेश मिसाळ, प्रगणक श्री दिनेश गायधने, पटेकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!