प्रा.डॉ प्रदीप ढवळ लिखित संन्यस्त ज्वालामुखी ग्रंथाचा 12 जानेवारी रोजी प्रकाशन सोहळा.

“सन्यास्त ज्वालामुखी” हा स्वामी विवेवाकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावर आधारित ग्रंथ
कणकवली/मयूर ठाकूर.
कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरुकुल आणि शारदा प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने
लेखक, नाटककार, कादंबरीकार व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष
प्रा. डॉ. प्रदीप ढवळ
लिखित स्वामी विवेकानंद यांच्या प्रेरणादायी जीवनकार्यावरील
‘संन्यस्त ज्वालामुखी’
या चरित्रपर कादंबरीचा
प्रकाशन सोहळा रविवार, दि. १२ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह (मिनी थिएटर) येथे आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार असून समारंभस्थळी केवळ निमंत्रितांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. तरी सदर प्रकाशन सोहळ्यास उपस्थित राहू इच्छिणाऱ्या रसिक मान्यवरांनी पूर्वनोंदणी करून आपला सहभाग निश्चित करून घ्यावा, ही विनंती आहे.
पूर्वनोंदणी आणि अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा :
श्री. आकाश ढवळ
82910 92511
आपले विनीत,
श्री. विलास ठुसे,
अध्यक्ष – शारदा एज्युकेशन सोसायटी, ठाणे