वाचनाने भाषेवर प्रभुत्व मिळते–फर्नांडिस

सतत वाचत राहिलो तर आपल्याला वाचनाची गोडी निर्माण होते व भाषेवर प्रभुत्व मिळविता येते त्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो यासाठी पाठ्य पुस्तकांबरोबर कथा जीवन चरित्र अशा प्रकारची पुस्तके वाचली पाहिजेत असे आवाहन काझी वाचनालयाचे सचिव जे एम फर्नांडिस यांनी वाचन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले. आचरा येथील काझी वाचनालयात वाचन स्पर्धेचे आयोजन केले होते या स्पर्धेत प्राथमिक शाळा गावूडवाडी व उर्दू शाळा या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांमधून तीन क्रमांक निवडून त्यांना शैक्षणिक साहित्य बक्षीस म्हणून देण्यात आले.

error: Content is protected !!