आशिये देव गांगो भैरीचा ७ जानेवारीला जत्रौत्सव

कणकवली तालुक्यातील आशिये येथील ग्रामदैवत श्री देव गांगो-भैरी देवाचा वार्षिक जत्रोत्सव दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्ताने सकाळी नित्य पूजा, अभिषेक, ओट्या भरणे, देवदर्शन, दुपारी आंब्रड येथील ढोल पथकाचा कार्यक्रम, स्थानिक भजने, रात्री ८.३० वाजता कासार्डे येथील सुप्रसिद्ध बुवा प्रकाश पारकर यांचे सुश्राव्य भजन होणार आहे.
तसेच रात्रौ १२ वाजता श्री वालावलकर दशावतार नाट्य मंडळ ओसरगाव यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग होणार आहे. तरी भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा व दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री क्षेत्र गांगो भैरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे.

error: Content is protected !!