संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये ‘नैसर्गिक रंगांची धुळवड’

सावंतवाडी : कोकणातील एक आगळावेगळा महत्वाचा व अनोखा असा एक सण म्हणजे होळी व रंगपंचमी. या सणाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 25 मार्च 2023 रोजी संस्कार नॅशनल स्कूल निरवडेमध्ये रंगपंचमी मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली.प्रशालेचे संस्थापक डॉ. शेखर जैन सर यांनी प्रशालेचे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी यांना रंग लावून होळीच्या व रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या.विविध रंगांनी प्रशालेचा सर्व परिसर रंगमय झाला होता व सर्व विद्यार्थी या रंगांमध्ये मनसोक्त न्हाऊन निघाले होते.
विद्यार्थ्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर करून रंगपंचमीचा आनंद घेत कृत्रिम रंगांचा आरोग्यावर किती घातक परिणाम होऊ शकतो व पाण्याचा वापर न करता *पाणी जपून वापरावे व पाण्याचा अपव्यय टाळावा हे लाख मोलाचे संदेश दिले.विविध नैसर्गिक रंग व सोबतीला रंगपंचमीची गाणी यावर सर्व विद्यार्थ्यांचे पाय थिरकत होते.शेवटी सर्व विदयार्थ्यांना गोड खाऊ वाटण्यात आला .अशा विविध रंगांच्या गोड आठवणी घेऊन सर्व विद्यार्थी आपापल्या घरी परतले.

सावंतवाडी / प्रतिनिधि

error: Content is protected !!