खेळामुळेच साधता येतो विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास – प्राध्यापक हरिभाऊ भिसे.
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज वरवडे प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न.
कणकवली/मयूर ठाकूर
.खेळामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येतो असे उदगार ज्ञानदा शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर यांनी काढले.वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्ञानदा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष श्री.मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल ,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर, टेबल टेनिस प्रशिक्षक श्री.तळेकर सर, संस्थेचे सल्लागार डी.पी तानावडे सर ,आयडियलच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई मॅडम,पी.टी.ए मेंबर्स सौ.रुबिया कुडाळकर मॅडम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
मार्च पास ने या कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर रायफल शूटिंग प्रात्यक्षिक, लेझीम डान्स सादर झाले .
चार हाऊसच्या विद्यार्थ्यांनी डंबेल डान्स, पॉप डान्स , अँरोबिक्स डान्स, आणि तालीम योगा डान्स सादर करत सर्वांची वाहवा मिळवली.
सारा खान आणि आमिर खान या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खेळाचे महत्व स्पष्ट केले .या निमित्ताने सर्व क्रीडा महोत्सवाच्या शिक्षक टीम चा मान्यवरांनी सत्कार केला तसेच चार डिसिप्लिन स्टुडंट इन्चार्ज ना सन्मानित करण्यात आले.
सेजल देसाईने खेळाची प्रतिज्ञा घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
2 डिसेंबर ते 5 डिसेंबर 2024 पर्यंत चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवासाठी ज्ञानदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष श्री मोहन सावंत, कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल, संस्थापक सचिव प्रा.हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्रा.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी.पी. तानावडे सर,प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई,प्रशालेचे शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेचे सहाय्यक शिक्षक श्री.हेमंत पाटकर यांनी केले.