पालकमंत्री नितेश राणे यांनी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जत्रोत्सवात सहभाग घेऊन देवदेवतांचे घेतले दर्शन

भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित
पालकमंत्री नितेश राणेंचा सत्कार
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांनी त्रिपुरारी जत्रोत्सवात सहभाग घेऊन देवदर्शन घेतले. यावेळी कणकवली शहराचे ग्रामदैवत श्री देव स्वयंभू रवळनाथाचे दर्शन घेऊन जनतेसाठी आशीर्वाद मागितले. कलमठ गावचे ग्रामदैवत श्री काशी कलेश्वर मंदिरात देवतेचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यातील कुर्ली गावचे ग्रामदैवत आई कुर्ला देवीच्या जत्रोत्सवात सहभाग घेऊन श्री कुर्ला देवीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्या मानकऱ्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वागतही केले.





