भाजपा सिंधुदुर्गात स्वबळावर निवडणुका लढवणार

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांचे सावंतवाडी येथील बैठकीत आदेश

सावंतवाडी मध्ये इच्छुक उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर गर्दी

अखेर सावंतवाडी येथे झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती म्हणून न लढता भाजपा स्वबळावरच लढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भाजपाची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सूचना दिल्याने आता येत्या काळात होऊ घातलेल्या नगरपंचायती, नगरपरिषदा व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका या भाजपा स्वबळावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आज झालेल्या या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना लागणारी सर्व ताकद देणार असे स्पष्ट केले असून पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांवर अन्याय होता नये याकरिता स्वबळावर निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला व प्रदेशाध्यक्षांनी या मागणीला जाहीरपणे दुजोरा ही दिला. त्यामुळे आज सावंतवाडी येथे झालेल्या बैठकीला मोठ्या प्रमाणावर जमलेल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

दिगंबर वालावलकर सिंधुदुर्ग

error: Content is protected !!