बंगळूरू येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत प्रज्योती श्रीकांत जाधव हिला कास्यपदक

दिनांक 31 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत राजीव गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंगळूरू येथे झालेल्या 42 वी राष्ट्रीय ज्युनिअर क्योरेगी व 15 वी पुमसे तायक्वांदो स्पर्धेत कुमारी प्रज्योती श्रीकांत जाधव हिने 59 ते 63 किलो वजनी गटामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक पटकावले आहे. प्रज्योतीने या आधीही शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे व तिची जम्मू-काश्मीर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रज्योती इयत्ता बारावी सायन्स मध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे शिकत आहे तसेच नगर वाचनालय येथील मास्टर स्पोर्ट तायक्वांदो अकॅडमी मध्ये राष्ट्रीय ताइक्वांदो प्रशिक्षक व पंच एकनाथ धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.
या यशाबद्दल तिचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व पंच प्रवीण बोरसे तसेच तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग चे पदाधिकारी भालचंद्र कुलकर्णी, सुधीर राणे, विनायक, सापळे अमित जोशी, तसेच क्रीडा शिक्षक महासंघ सिंधुदुर्ग चे अध्यक्ष बयाजी बुराण यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!