सिंधुदुर्गचे खासदार, कुडाळचे आमदार वर्षभर गायब, खासदार, आमदारांच्या मॅनेजरांकडून मात्र लोकांना फसवी आश्वासने – वैभव नाईक

आचरा विभागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद

      सिंधुदुर्गचे खासदार, कुडाळ मालवणचे आमदार वर्षभर गायब आहेत, मात्र खासदार, आमदारांनी नेमलेले मॅनेजर वेगवेगळ्या गावात जाऊन कार्यकर्त्यांना फसवी आमिषे, खोटी आश्वासने देऊन शिंदे गटात प्रवेश घेत आहेत. ज्या भाजप पक्षाच्या जीवावर ते आमदार  झाले त्याच भाजप पक्षातील कार्यकर्ते फोडून, शिवसेनेचे कार्यकर्ते फोडल्याचे ते सांगत आहेत. नागरिकांना पाच पाच लाखाच्या रस्त्यांची आश्वासने दिली जात आहेत.परंतु कुडाळ व मालवण तालुक्यातील राज्यमार्ग, जिल्हामार्गाची अवस्था दयनीय झाली आहे ते रस्ते दुरुस्त करण्याची धमक सत्ताधाऱ्यांमध्ये नाही. जलजीवन मिशनची कामे सत्ताधारी पूर्ण करू शकले नाहीत. शेतकऱ्यांना, मच्छीमारांना नुकसान भरपाई देऊ शकले नाहीत. अनेक मोबाईल टॉवर बंद आहेत त्यामुळे लोकांना रेंजची समस्या उदभवत आहे. अदानीचे स्मार्ट मीटर जबरदस्ती बसवून नागरिकांकडून वारेमाप वीज बिले आकारली जात आहेत. कुडाळ मालवण मतदारसंघातील जनता अशा विविध समस्यांनी त्रस्त आहे. परंतु खासदारांना आणि आमदारांना जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ नाही. निवडून येऊन १ वर्षे झाले तरी ते लोकांना भेटले नाहीत. त्यांनी नेमलेले मॅनेजर तरी जनतेचे प्रश्न सोडवितील अशी जनतेला अपेक्षा होती. परंतु मॅनेजरांना पक्ष प्रवेशाची टार्गेट दिलेली असल्याने जनतेचे प्रश्न सुटत नाहीत अशी टीका माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. 

             कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांनी आचरा जिल्हा परिषद विभागात दौरा करत तोंडवळी, आचरा, त्रिंबक, बांदिवडे, चिंदर, पळसंब या गावातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यात आल्या. पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मते जाणून घेत त्यांना येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, आचरा विभागप्रमुख समीर लब्दे, आचरा विभाग संघटक पप्पु परुळेकर, उपविभाग प्रमुख सचिन रेडकर, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, आचरा विभाग संघटक मंगेश टेमकर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

        वैभव नाईक पुढे म्हणाले, जरी आपण निवडून आलो नसलो तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने आपल्याला कार्यरत राहायचे आहे.आज आपण केलेल्या फळ पीक विम्याच्या आंदोलनाला यश आले या आंदोलनामुळे विम्याचे पैसे सरकारला देण्यास भाग पडले. अवकाळी पावसामुळे भात, भुईमूग, नाचणी व इतर  पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळण्यासाठी कृषी मंत्र्यांना मी पत्र लिहिले आहे. मात्र येथील आमदार सत्तेत असूनही ट्विटर/एक्सवर पोस्ट टाकून महायुती सरकारकडून मदतीच्या अपेक्षा व्यक्त करत आहेत. एकाही शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी  आमदार, खासदार यांनी केली नाही. हि कुडाळ मालवणसाठी दुर्दैवाची बाब आहे. मात्र कोणीही काही करो, मी माझे काम करत राहणार आहे. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकवायचा आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी एकजुटीने निवडणुकांसाठी मोर्चे बांधणी करा, विजयासाठी मेहनत घ्या. लोकांच्या सुखदुःखात आपणच सहभागी असतो त्यामुळे लोकांना विश्वासात घ्या. असे मार्गदर्शन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले. 
        तोंडवळी येथे उपसरपंच हर्षद पाटिल, माजी सरपंच संजय केळुसकर, माजी उपसरपंच दशरथ वायंगणकर, प्रमोद पाटील, शाखा प्रमुख दिलीप पुजारे, उप शाखाप्रमुख बंटी गोलतकर, युवासेना शाखाप्रमुख संदेश चेंदवणकर, ग्रा. पं. सदस्य ज्ञानेश गोलतकर, ग्रा. पं सदस्य सौ. मानसी चव्हाण, दिक्षा गोलतकर आदी.  
       आचरा येथे माजी सरपंच शाम घाडी, आचरा पारंपारीक मच्छिमार नेते नारायण कुबल, शहरप्रमुख माणीक राणे, शहर संघटक नितीन घाडी, युवासेना शहरप्रमुख विद्यानंद परब, ग्रा. पं. सदस्य पुर्वा तारी, जगदीश पांगे, लवु मालंडकर, संजय वायंगणकर, संजय परब, सचिन‌ बागवे, सचिन मेस्त्री, राजु परब, जितु आचरेकर, परेश तारी, विठ्ठल सारंग, सुंदर आचरेकर आदी
     त्रिंबक येथे शेतकरी विकास संस्था चेअरमन श्रीकांत बागवे, शाखाप्रमुख संतोष गोरवले, शाखाप्रमुख संतोष घाडीगावकर, ग्रा. पं.सदस्य सागर चव्हाण, ग्रा. पं. सदस्य रोहीत त्रिंबककर, संजय तेली, उपशाखा प्रमुख हरी साटम, शेखर घाडीगावकर, उमेश‌ घाडीगावकर, पांडु लोके, राकेश गावडे, दाजी भाटकर आदी. 
    बांदिवडे येथे गावप्रमुख रंजन प्रभु, शाखाप्रमुख मधु परब, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, ग्रा. पं. सदस्य नारायण परब, मया हिर्लेकर, आप्पा परब, बबलु मिठबावकर, अष्विन बांदकर, बाळा परब , योगेश मेस्त्री आदी. 
    चिंदर येथे संजय हडपी, युवासेना उप विभागप्रमुख मया माडये, मिथुन माळगावकर, शाखाप्रमुख सतीश हडकर, चिंदर बाजार शाखाप्रमुख प्रसाद टोपले, गावठणवाडी शाखाप्रमुख बाबु कदम, संजु सामंत, राजु खरात, महेश पांचाळ, माजी चेअसमन संजय माळकर, ओमकार वळंजु, संतोष पाटणकर, अर्जुन पवार, उत्तम घाडी,बाळा पाटणकर आदी. 
     पळसंब येथे शाखाप्रमुख रामदास चव्हाण, अशोक सावंत, प्र. सरपंच अविराज परब, माजी सरपंच रमेश परब, युवासेना शाखाप्रमुख कपील मुणगेकर, दाजी गोलतकर, एकनाथ चिंचोलकर, दिनेश साईल, मंदार सावंत आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!