“कणकवली कॉलेज कणकवली ज्यूनिअर विभागाचा युवा महोत्सव 2024 उत्साहात साजरा.
कणकवली/मयूर ठाकूर
कणकवली कॉलेज कणकवली कनिष्ठ विभागाचा दिनांक 29 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या युवा महोत्सव 2024 चे उद्घाटन शुक्रवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक 11 वा. कणकवली कॉलेजच्या एच.पी.सी.एल. हॉल येथे संस्थेच्या चेअरमन आद. डॉ. सौ.राजश्री साळुंखे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी कणकवली कॉलेज कणकवली चे प्राचार्य आद. प्रा. युवराज महालिंगे, पर्यवेक्षक आद. प्रा. एम. के. माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख आद. प्रा. हरिभाऊ भिसे व कनिष्ठ विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
या उद्घाटन कार्यक्रमास संबोधित करताना डॉ. सौ.राजश्री साळुंखे यांनी हा उपक्रम राबविला म्हणून कनिष्ठ विभागाचे भरभरून कौतुक केले. या आणि अश्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून ते वाढीस लागण्यास मदत होते. अशा उपक्रमात मदत करण्यास आपली संस्था सदैव पाठीशी आहे सांगत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे यांनी या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा मिळते कलाटणी मिळते असे सांगत शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
पर्यवेक्षक प्रा. एम.के.माने यांनी शिक्षक व विद्यार्थी वर्गाला शुभेच्छा देत कार्यक्रम उत्कृष्ट पणे पार पाडण्याचे आवाहन केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. हरीभाऊ भिसे आणि सूत्रसंचालन प्रा. व्ही. सी. सावंत तर आभार प्रा. व्ही. आर. सावंत यांनी मांडले. यावेळी कानिष्ठ विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमानंतर सर्व विभागाच्या वतीने युवा महोत्सव 2024 च्या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली. या स्पर्धामध्ये रांगोळी, मेहंदी, संगीत,गायन, नृत्य (एकेरी व समूह), फॅन्सी ड्रेस, निबंध,वक्तृत्व, कथाकथन, वादविवाद, पोस्टर मेकिंग, चित्रकला, प्रश्नमंजुषा, अभिवाचन, मातीकाम यांचा समावेश होता. या स्पर्धांमध्ये इयत्ता अकरावी व बारावी कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम या वर्गातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा दि. 30 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 3 वाजता संस्था सचिव आद. विजयकुमार वळंजू यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्राचार्य युवराज महालिंगे, पर्यवेक्षक प्रा.एम. के. माने, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हरिभाऊ भिसे, वरिष्ठ लिपिक आद. एस.एस.राणे, सर्व शिक्षक व स्पर्धकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना आद. विजयकुमार वळंजूसाहेब यांनी आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी मेहनती बरोबरच विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणे गरजेचे आहे. या स्पर्धा आपल्याला प्रगतीचे पंख देतात. आपण केलेल्या मेहनतीचे आपल्याला निश्चितच फळ मिळते, असे सांगितले. प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे सर यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. प्रा. भिसे यांनी पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. व पर्यवेक्षक प्रा.एम.के. माने यांनी सर्वांचे आभार मानले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. व्ही.सी. सावंत यांनी केले. सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे सहभाग प्रमाणपत्र देऊन आणि प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना पारितोषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.