संगीतमय ‘भजन संध्या’ कार्यक्रमाने भाविक मंत्रमुग्ध होणार!

कणकवलीतील भालचंद्र महाराज संस्थान मध्ये होणार कार्यक्रम
प. पू. भालचंद्र महाराज संस्थान व्यासपीठ, कणकवली (जि. सिंधुदुर्ग) येथे सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता “अद्वितीय संगीत भजन संध्या” या भक्तिमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या भजन संध्येत रायगड भूषण भजन सम्राट बुवा श्री. कृष्ण देशमुख, सिंधुदुर्गची शान संगीत अलंकार बुवा श्री. अजित गोसावी, तसेच ह. भ. प. बंडाराज घाडगे हे आपले सुमधुर भजनसंगीत सादर करणार आहेत. अजित गोसावी यांना तबल्यावर रोहन पाटील यांची साथ असेल.
भजन रसिकांसाठी आणि संगीतप्रेमींसाठी हा एक खास संगीताचा आस्वाद ठरणार आहे. सिंधुदुर्गातील भक्तजनांनी या भक्तिसोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.





