रविवारी कुडाळात डॉ. स्वर्गीय प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर जीवन गौरव

नाईक मराठा मंडळ मुंबईचा शताब्दी महोत्सव 

नाईक मराठा मंडळ मुंबई या संस्थेचा यंदा शताब्दी महोत्सव असून यानिमित्त रविवार दिनांक 9 नोव्हेंबर 20 25 रोजी कुडाळ येथील सर्वसामान्यांचे देवदूत स्वर्गीय डॉक्टर प्रमोद वालावलकर यांना मरणोत्तर जीवन गौरव अर्पण केला जाणार आहे अशी माहिती नाईक मराठा मंडळ मुंबई कार्यकारीणीच्या वतीने मुंबई मंत्रालय येथील वरिष्ठ पत्रकार किरण नाईक यांनी दिली आहे.
नाईक मराठा मंडळाचे मार्गदर्शक स्वर्गीय मधुकर नारायण तथा बाबा आचरेकर यांच्या स्मरणार्थ हा जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो. यंदा तो सर्वसामान्यांसाठीचे देवदूत म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर स्वर्गीय प्रमोद वालावलकर यांना अर्पण केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, नाईक मराठा मंडळ मुंबई चे कार्याध्यक्ष सुनील सांगेलकर ,देवळी समाज हितवर्धक मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वर्गीय डॉ. प्रमोद वालावलकर यांना हा मरणोत्तर जीवन गौरव सोहळा अर्पण केला जाणार आहे असे श्री किरण नाईक यांनी सांगितले.
रविवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक दहा वाजता महालक्ष्मी हॉल, हॉटेल गुलमोहर नजीक कुडाळ येथे होणाऱ्या या कार्यक्रमास स्वर्गीय डॉ. प्रमोद वालावलकर प्रेमींनी तसेच समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही किरण नाईक यांनी केले आहे यावेळी नाईक मराठा मंडळ मुंबईच्या वतीने शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रमही होणार आहे असे ही नाईक यांनी सांगितले.
error: Content is protected !!