एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली हा उपक्रम नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर घेणार!

कणकवली पर्यटन महोत्सव देखील निवडणूक निकालानंतरच दिमाखात साजरा होणार

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे चिमुकल्यांना अभिवचन

कणकवली शहर भाजपा व समीर नलावडे मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा एक दिवस छोट्यांसाठी हा लहान मुलांचा खाऊ गल्ली हा उपक्रम यावर्षी कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच घेतला जाणार आहे. शहरातील लहान मुले व त्यांच्या पालकांना या उपक्रमाची दरवर्षी उत्सुकता असते. बाल दिनानिमित्ताने गेली काही वर्ष सातत्याने हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. मात्र यावर्षी निवडणूक आचारसंहिता व त्या अनुषंगाने असणाऱ्या तांत्रिक अडचणी यामुळे हा कार्यक्रम निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घेण्यात येणार आहे. लहान मुलांना व त्यांच्या पालकांना मुळीच नाराज केले जाणार नाही. हे माझे वचन आहे. अशी माहिती कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तसेच कणकवली शहर भाजपा च्या वतीने आयोजित केला जाणारा दरवर्षीचा कणकवली पर्यटन महोत्सव देखील कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच दिमाखात साजरा केला जाईल असे देखील श्री नलावडे यांनी सांगितले. कणकवली शहर भाजपा आयोजित एक दिवस छोट्यांसाठी खाऊ गल्ली या उपक्रमाची उत्सुकता दरवर्षी या लहान मुलांना असते. या उपक्रमाच्या निमित्ताने लहान मुलांना धमाल, मस्ती व मजेचा हा पर्वणी घेऊन येणारा दिवस असतो. त्यामुळे हा कार्यक्रम यावर्षी केव्हा घेतला जाणार याची उत्सुकता मुलांना व त्यांच्या पालकांना लागून राहिली होती. मात्र नगरपंचायत निवडणुकीमुळे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर या कार्यक्रमाची घोषणा केली जाणार आहे. व एक लहानग्यांसाठी असलेली ही आनंदची पर्वणी आम्ही घेऊन येणार आहोत अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली.

error: Content is protected !!