जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागात राडा

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्यामुळे उबाठा शिवसेनेच्या नेत्यासह अंगरक्षकांमध्ये बाचाबाची होऊन हाणामारी झाली. सावंतवाडी येथील एका इमारतीच्या बांधकामाची निविदा निघाली होती ही निविदा सुमारे कोट्यवधी रुपयांची होती ही निविदा भरण्याची अंतिम मुदत आज (सोमवार) होती. दरम्यान ही निविदा भरण्यासाठी सावंतवाडी येथील ठेकेदार जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात आला होता आणि त्याने आपल्या सोबत अंगरक्षक आणले होते हे अंगरक्षक बांधकाम विभागाच्या दरवाजावर उभे राहून या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींना त्यांचे काम विचारून त्यांच्या जवळील कागदपत्रांची पडताळणी करत होते. दरम्यान ही घटना ओरोस येथे असलेल्या उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी व नेत्यांना समजली त्यांनी तात्काळ बांधकाम विभागाकडे धाव घेतली आणि या अंगरक्षकांना जाब विचारता त्यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी नेते यांच्यासोबत अंगरक्षकांची बाचाबाची झाली त्यामधून उबाठा शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी या अंगरक्षकांना उसकावून लावले काही अंगरक्षक पळून गेले तर काही अंगरक्षकांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभाग यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

error: Content is protected !!