मालवण आयटीआय मध्ये संविधान मंदिराचे उदघाटन

आचरा–अर्जुन बापर्डेकर

मालवण कुंभारमाठ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये स्थापना केलेल्या संविधान मंदिराचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने तसेच मालवण आयटीआयचे प्राचार्य सचिन संखे आणि मालवण शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य पी. एस. शिरहट्टी प्राचार्य यांच्या हस्ते संपन्न झाले. यानिमित्त मालवण आयटीआय मध्ये संविधान महोत्सवही साजरा करण्यात आला.

सामाजिक न्यायाची खरी शिकवण हि भारताच्या संविधानातून प्राप्त्होत असल्याने कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीना खरी सामाजिक न्यायाची शिकवण मिळावी यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ४३४ शासकिय आयटीआय मध्ये संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. या संविधान मंदिराचे उदघाटन उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांच्या हस्ते एलफिन्सटन विद्यालय मुंबई येथुन आभासी पदधतीने झाले. मालवण आयटीआय मधील संविधान मंदिराच्या उदघाटन कार्यक्रमास संस्थेतील कर्मचारी, आजी माजी प्रशिक्षणार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, संविधान प्रेमी उपस्थित होते.

संविधान मंदिरा बाबत जागरूकता व्हावी, घटनात्मक अधिकार व कर्तव्या बद्दल जागरूकता, संविधानाच्या दुरूस्त्या, कायदेशीर कलम, राज्यघटनेचे आकलन प्रशिक्षणार्थीनच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने मालवण आयटीआय मध्ये प्राचार्य सचिन संखे यांच्या निरीक्षणा खाली संविधान महोत्सव साजरा होऊन यामध्ये निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व इतर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

error: Content is protected !!