आनंदा बामणीकरआदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी l दोडामार्ग
शिक्षक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ दोडामार्ग हायस्कूलचे शिक्षक आनंदा लक्ष्मण बामणीकर यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रम नरिमन पॉईंट मुंबई टाटा थिएटर येथे संपन्न झाला. पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते.पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व एक लाख दहा हजार रुपये असे आहे.