जिल्हास्तरीय शुटिंग बॉल स्पर्धेत आचरा कनिष्ठ महाविद्यालय प्रथम


आचरा–अर्जुन बापर्डेकर
प्रगत विद्यामंदिर रामगड येथे झालेल्या जिल्ह्यास्तरीय शालेय शुटिंग बाॅल स्पर्धेत १७वर्षा खालील गटात न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचराच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.सदर विद्यार्थ्यांची विभाग स्तरावर निवड झाली आहे. या संघात सहभागी झालेल्या
अनुष अनिल परब,कौस्तुभ सीताराम सकपाळ,दुर्वेश भालचंद्र अपराज,नमित जनार्दन घाडी,प्रतीक सुनील परब,प्रथमेश राजेंद्र पुजारे,प्रथमेश प्रकाश येरमाळकर
,मोहम्मदमिझान शादाब मुकादम,शुभम विश्राम मालवणकर,हर्षद रामचंद्र मेस्त्री या विद्यार्थ्यांना सुरेंद्र सकपाळ, संदिप रावले, प्रकाश शेलार यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे
मुख्याध्यापक गोपाळ परब, उपमुख्याध्यापक घुटूकडे यांसह धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई समिती, स्थानिक शाळा समिती पदाधिका-यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!