नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग, शाखा-कणकवलीच्या वृक्ष बँकेमार्फत ओरोस येथील शेतकऱ्यांना 100 झाडांचे वाटप.

मनसे तालुकाध्यक्ष शांताराम सादये,शहरप्रमुख श्री.योगेश कदम,संस्थेचे तालुकाध्यक्ष अतुल दळवी,पदाधिकारी अमित जाधव यांच्या हस्ते करण्यात आले वितरण.

कणकवली/मयूर ठाकूर

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था सिंधुदुर्ग शाखा कणकवली च्या वृक्ष बँके मार्फत चालू वर्षी जिल्ह्याभरात सुमारे एक हजार हुन अधिक झाडांचे वितरण करण्यात आले. जिल्ह्यात प्रथमच या संस्थेच्या माध्यमातून आणि कणकवली तालुका अध्यक्ष अतुल दळवी यांच्या पुढाकाराणे जिल्ह्यातली पहिली वृक्ष बँक स्थापन करण्यात आली आणि या वृक्ष बँक मार्फत विविध ठिकाणी या झाडांचे वितरण करण्यात आले.नुकतेच कणकवली तालुका अध्यक्ष अतुल दळवी यांच्या माध्यमातून ओरोस येथील शेतकऱ्यांना सुमारे शंभर झाडें वितरित करण्यात आली.
मनसे तालुका अध्यक्ष शांताराम सादये यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.प्रसंगी मनसे शहरप्रमुख योगेश कदम,मनसे पदाधिकारी अमित जाधव, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन आणि मानवता विकास संस्था शाखा कणकवली चे अध्यक्ष अतुल दळवी,युवाध्यक्ष मयूर ठाकूर आणि ओरोस येथून यशवंत म्हसकर उपस्थित होते.
मनसे पक्षाच्या कणकवली तालुका पदाधिकाऱ्यांचे यापूर्वी संस्थेच्या उपक्रमांसाठी योगदान लाभलेले आहे.यापुढील काळातही मानवता विकासा संदर्भात संस्थेच्या उपक्रमांसाठी जे काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही स्वतः पुढाकार घेऊ असे आश्वासन यावेळी तालुकाध्यक्ष शांताराम सादये यांनी दिले.

error: Content is protected !!