अनिरुद्ध आडीवरेकर याचे सीए परीक्षेत यश

जिल्ह्याभरातून अनिरुध्द यांचे होतेय कौतुक
कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार जगन्नाथ वळंजू यांचा नातू अनिरुद्ध संजय आडीवरेकर याने सीए परीक्षेत मोठे यश मिळविले आहे. अनिरुद्ध याचे कुटुंब मुंबईत स्थाईक असले तरी फणसगाव हे त्याचे मूळ गाव असून सिंधू पुत्राच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्याचे कौतुक होत आहे.
सीए व्हायचे हे अनेकांचे स्वप्न असते, मात्र या कठीण परीक्षेत काही मोजके लोक टिकतात. फणसगावचे मूळ रहिवाशी असलेले आणि सध्या कायमस्वरूपी मुंबईत स्थाईक झालेल्या प्रसिद्ध सीए संजय आडीवरेकर यांचा चिरंजीव आणि कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव विजयकुमार जगन्नाथ वळंजू यांचा नातू अनिरुद्ध संजय आडीवरेकर याने सीए परीक्षेत मोठे यश मिळविले आहे. या कठीण परीक्षेत अनिरुद्ध यशस्वी झाला आहे. या प्रवासात आपल्याला आपले सीए असलेल्या वडील यांचे मोठे मार्गदर्शन मिळाल्याचे अनिरुद्ध म्हणाला आहे. त्याच्या या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्याचे कौतुक होत आहे.
कणकवली प्रतिनिधी