खासदार नारायण राणे यांनी केली खारेपाटण येथील पुरस्थिती नुकसान भागाची पाहणी

नुकसान ग्रस्त लोकांच्या समस्या घेतल्या जाणून

तातडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला दिले आदेश

खारेपाटण येथे मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडून खारेपाटण येथे पुरस्थिती निर्माण झाली होती. अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते.पुराचे पाणी काही लोकांच्या घरात देखील घुसले होते. यामुळे लोकांचे नुकसान झाले.
खारेपाटण येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात येथील मासळी मार्केट, चिकन विक्रेते मेडिकल, भूषारी दुकाने, हॉटेल्स, कापड दुकाने, बसस्थानक, मोबाईल शॉप, हार्डवेअर याचे मोठे नुकसान झाले. रत्नागिरी – सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी आज खारेपाटण येथे भेट देउन नुकसानग्रस्त भागाची पहाणी केली. तसेच प्रशासकीय अधिकऱ्यांकडून देखील उद्भवलेल्या आपत्तीची माहिती घेतली. बाजारपेठेतील दुकांदारांशी खासदार नारायण राणे यांनी चर्चा करुन तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सूचना केल्या.
यावेळी खासदार नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रशासनाला नुकसान भरपाईच्या सूचना दिल्या आहेत. याबाबत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यसरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार नारायण राणे यांनी सांगितले. तसेच भविष्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन करून येणाऱ्या वर्षात मे महिन्याच्या आधी नदीचा गाळ काढला जाईल. तसेच कोणत्याही सूचना न देता सोडण्यात येणारं धरणाच पाणी इ कोणत्याही प्रकारच्या सूचना केल्याशिवाय सोडू नये यासाठी संबंधितांना सूचना केल्या जातील. तसेच बंधाऱ्यासाठी प्रयत्न करून येणाऱ्या वर्षात ते पूर्ण करून घेऊन असे आश्वासन खारेपाटण वासीयांना खासदार नारायण राणे यांनी दिले.
यावेळी प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार दिक्षांत देशपांडे,खारेपाटण सरपंच प्राची इस्वलकर, तसेच सर्व प्रशासकीय खात्याचे अधिकारी यामध्ये आरोग्य, वीज, कृषी या सर्वच खात्याचे अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक, उपसरपंच महेंद्र गुरव व ग्रामपंचायत सदस्य, मा. जि. प सदस्य. रवींद्र जठार, पं. स. सदस्या -तृप्ती माळवदे, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष प्राजल कुबल, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख -सूर्यकांत भालेकर,सुधीर कुबल, राजू वरूनकर, सदस्या -सौ.मनाली होनाळे, क्षितिजा धुमाळे,किरण कर्ले, दक्षता सुतार,आस्थाली पवार,शेखर शिंदे, उज्वला चिके, वीरेंद्र चिके,इस्माईल मुकादम,कुरंगावणे सरपंच -पप्पू ब्रह्मदडे,अविनाश गाठे, पिंटू सर्पे तसेच खारेपाटण येथील ग्रामस्थ, व्यापारी, तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!