सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कला अकादमी मंजूर करा!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकार मानधन चे उद्दिष्ट 100 वरून 200 वर करा
कलाकार मानधनात वाढ केल्याबद्दल मानले मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार
जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी आमदार नितेश राणें सहीत घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये वेगवेगळी कला सादर करणारे नूतन कलाकार हे बहूसंख्य पटीने तयार होत असुन त्यांना कला आत्मसात करण्यासाठी व हे सर्व कलाकार एकाच छताखाली येवून या कलेची वाढ व्हावी त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये कला अकादमी आपल्या कार्यालयाकडून येत्या काळामध्ये मंजुर व्हावी अशी मागणी राजर्षी छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. अधिवेशनादरम्यान मंत्री मुनगंटीवार यांची आमदार नितेश राणे यांच्यासोबत श्री कानडे यांनी भेट घेत ही मागणी केली. यावेळी सिंधुदुर्गातील कलाकारांच्या मागण्यांबाबत विविध निवेदने देत त्यांचे लक्ष वेधण्यात आले. कलाकारांना मानधन देण्याकरिता देवापासून जवळ असणाऱ्या भक्तजनांसाठी म्हणजेच कलाकारांना मिळणारे मानधन हे अतिशय तुटपुंजे होते. आपण व आपल्या सरकारने कलाकारांचे मानधन २२५०/- वरून ५०००/- पर्यंत नेवून जो कलाकारांचा सन्मान केला त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हयातील समस्त कलाकारांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्हा हा कलाकारांची पंढरी म्हणून ओळखला जाणारा एकमेव जिल्हा असुन, या जिल्हयामध्ये वेगवगळी कला भजन, दशावतार व ठाकर कला असे असंख्य कला सादर करणारे कलाकारांची संख्या वाढत असून, आपल्या कार्यालयाकडून कलाकारांना मानधन हे एका वर्षाला १०० कलाकारांना आपण देतो. त्यामध्ये असंख्य कलाकार मानधनापासून वंचित राहतात १०० कलाकारांच्या जागी २०० कलाकारांचे उदिष्ठ आपल्या मार्फत मंजुर व्हावे अशी देखील मागणी श्री कानडे यांनी याप्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. मंत्र्यांनी या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिल्याची माहिती श्री कानडे यांनी दिली.
दिगंबर वालावलकर /कणकवली