नारायण राणेंची खासदारकी रद्द करा, मतदानासाठी बंदी घाला..

विनायक राऊतांची मागणी; निवडणूक आयोगाला बजावली नोटीस…

चुकीचा मार्ग वापरून खासदार नारायण राणे यांनी लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्यात यावी. त्यांच्यावर ५ वर्षे निवडणूक लढविण्यासाठी व मतदान करण्यासाठी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी ठाकरे सेनेचे पराभूत उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक आयोगाला अँड. असीम सरोदे, किशोर वरक व श्रेया आवले यांच्या माध्यमातून नोटीस पाठवती आहे. यात श्री. राणे यांनी चुकीच्या पद्धतीने प्रचार केला तसेच ईव्हीएम मशीन दाखवून राणेंनाच मतदान करा, असे सांगून राणे समर्थकांनी मतदान करण्याचे आवाहन केले तसेच मतदारांना पैशाचे वाटप करण्यात आले तर दुसरीकडे राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले. मतदारसंघात लीड मिळाले नाही तर तुम्हाला यापुढे निधी मिळणार नाही, असा इशारा दिला. या सर्व गोष्टींचे आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे ७ दिवसाच्या आत केंद्रीय निवडणूक आयोगाने या नोटीसीला उत्तर द्यावे, अन्यथा या प्रक्रियेच्या विरोधात उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करू, असा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती अॅड. किशोर वरक यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.

error: Content is protected !!