पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा होणार गुणगौरव

कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने 2022-23 आणि 2023-24 या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती, दहावी, बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसेच इतर परीक्षेत किंवा क्रीडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवलेल्या कणकवली तालुक्यातील पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव केला जाणार आहे.तरी संबधीत पत्रकार मित्रांनी आपल्या पाल्यांची नावे गुणपत्रिका झेरॉक्स प्रतीसह पत्रकार संघाचे खजिनदार योगेश गोडवे (9422436217, 9021435050, तहसील कार्यालय नजीक) यांच्याकडे 25 जूनपर्यंत नोंदवावीत. लवकरच कार्यक्रम रूपरेषा कळवली जाईल. असे आवाहन अजित सावंत-अध्यक्ष,
माणिक सावंत- सचिव
कणकवली तालुका पत्रकार संघ व सर्व कार्यकारिणी च्या वतीने करण्यात आले आहे.

कणकवली/प्रतिनिधी

error: Content is protected !!