जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगिवे येथील विद्यार्थ्यांना शिवगर्जना मित्र मंडळ नडगीवे यांचे कडून शैक्षणिक साहित्याचे वाटप
ज्या गावांमध्ये आपण जन्म घेतो त्या गावाशी आपले भावनिक नाते असते तेथील विद्यार्थ्यांना माणुसकीच्या भावनेतून मदत करणे हे परोपकाराचे लक्षण असून तसंच छत्रपती शिवरायांचा समाजाप्रती असणारा त्याग सेवा व समर्पण या विचारसरणीला अनुसरून नडगेवे येथील शिवगर्जना मित्र मंडळ नडगीवे मराठी शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून यांनी माणुसकीचा धर्म निवडला हा उपक्रम पंचक्रोशीत आदर्श असल्याचं मत गावच्या सरपंच श्रीमती माधवी मण्यार यांनी साहित्य वाटप करताना व्यक्त केला
नडगिवे गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नडगवे नंबर एक या प्रशालेमध्ये नडगीवे नंबर एक नडगिवे नंबर दोन व वायंगणी या गावातील वर्ग एक ते सात पर्यंतच्या सर्व मुलांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं शिवगर्जना मित्र मंडळ नडगीवे यांनी आयोजन केलं होतं
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून गावचे सुपुत्र श्री प्रमोद जी मुद्रस गावच्या सरपंच श्रीमती माधवी मण्यार उपसरपंच भूषण कांबळे शिवगर्जना मित्र मंडळ अध्यक्ष श्री अमित सावंत सामाजिक कार्यकर्ते दिलीप मण्यार नडगिवे ग्राम तंटा समिती अध्यक्ष श्री सुनील कर्ले ग्रामपंचायत सदस्य लता हिवाळकर मयुरी करले प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटकर शाळा व्यवस्थापन समिती नडगिवे नंबर एक अध्यक्ष श्री सतीश करले श्रीधर मण्यार आदी मान्यवर उपस्थित होते
शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे हे नेहमीच गावच्या विकासासाठी तसेच सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये अग्रेसर असते समाजाभमुख अनेक उपक्रम राबवत असताना गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आवश्यक त्या शैक्षणिक साहित्याचे वाटप गेली सलग तीन वर्षांपासून हे मित्र मंडळ करत आलेला आहे या शैक्षणिक साहित्याच्या संख्यामध्ये एक दप्तर आवश्यक वह्या पेन पेन्सिल रंगीत खडू व एक छत्री तसेच लहान मुलांना खाऊचेही वाटप करण्यात आले आदी साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.
संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवगर्जना मित्र मंडळ नडगिवे चे सर्व सदस्यांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अमोल तुपविहीरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री संदीप कदम यांनी मांडले.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण