डिझाइनच्या दुनियेचा नवा ‘आरंभ’! कणकवलीत.

‘फ्लोरेट कॉलेज’चे भव्य फॅशन आणि इंटिरियर प्रदर्शन 17 आणि 18 जानेवारी रोजी.

या भव्य प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू.

कणकवली/मयूर ठाकूर कणकवली येथील नामांकित‘फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग’ तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ‘आरंभ प्रदर्शन २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.’वर्ल्ड मीट्स संस्कृती’(World Meets Sanskriti)या अनोख्या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन शनिवार आणि रविवारी रसिकांसाठी खुले असणार आहे.प्रदर्शनाची खास वैशिष्ट्ये म्हणजे या प्रदर्शनात कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वतः साकारलेले नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले जाणार आहेत.यात मुख्यत्वे दोन विभागांचा समावेश असेल यामध्ये इंटिरियर डिझाइन अर्थात घराची आणि कार्यालयाची सजावट आधुनिक व सांस्कृतिक पद्धतीने कशी करावी,याचे उत्तम नमुने या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळणार आहेत.तसेच फॅशन डिझाइन मध्ये भारतीय संस्कृती आणि जागतिक फॅशनचा मेळ घालणारे डिझायनर कपडे आणि कलाकृती यांचा समावेश आहे.
या भव्य एक्झिबिशन साठी फ्लोरेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी जॅपनीज थीम च्या माध्यमातून चिल्ड्रन बेडरूमची उभारणी केली आहे.तसेच जंगल थीम घेऊन ॲमेझॉन रेन फॉरेस्ट मध्ये कॅफे उभा केला आहे.तसेच डिझायनिंग क्षेत्रातील छोटे मॉडेल्स या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळतील.जगामध्ये नांदणाऱ्या वेगवेगळ्या संस्कृतींचा हात धरून इंटेरियर कसे आकर्षक असावे,तसेच जागतिक दृष्टिकोनातून फॅशनकडे पाहण्याची समज विकसित करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि डिझायनिंग क्षेत्रातील नवनवीन प्रवाह जाणून घेण्यासाठी हे प्रदर्शन एक विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे.हा भव्य सोहळा दिनांक १७ आणि १८ जानेवारी २०२६ (शनिवार आणि रविवार)रोजी सकाळी १०:०० ते रात्री 6.०० पर्यंत संपन्न होणार आहे.या भव्य प्रदर्शनाचे ठिकाण फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग,कंजूमर सोसायटी,पहिला मजला,कणकवली कॉलेज रोड,नवीन पोस्ट ऑफिसच्या वर,कणकवली, असून जिल्ह्यातील सर्व युथ आणि सर्व शाळा कॉलेज चे विदयार्थी आणि शिक्षकवृंद तसेच कला क्षेत्राची आवड असलेले सर्व कलाकार यांनी हे आगळे वेगळे संपन्न होत असलेले प्रदर्शन पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संचालक सचिन बोराटे आणि संचालिका सार्था कदम यांनी केले आहे.

error: Content is protected !!