रत्नागिरी सिंधुदुर्ग च्या मतमोजणी मध्ये राणे – राउतांमध्ये काटे की टक्कर

मताधिक्यामध्ये राणे – राऊत यांचा जोरदार मुकाबला
कार्यकर्त्यांची देखील उत्कंठा वाढली
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निकालात नारायण राणे व विनायक राऊत यांच्यामध्ये काटे की टक्कर सुरू आहे. या सुरुवातीच्या फेरीत नारायण राणेंनी लीड घेतल्यानंतर त्यानंतरच्या काही फेऱ्यांमध्ये राऊत आघाडीवर राहिले. तर पुन्हा राणे पुन्हा राऊत अशी मताधिक्याची संगीत खुर्ची सुरू आहे. सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीची उत्कंठा मिनीटा मिंनीटाला वाढत असून नारायण राणे व विनायक राऊत यांच्या समर्थकांमध्ये देखील या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे उपलब्ध माहितीनुसार राऊत व राणे यांच्यामध्ये चाललेली काटे की टक्कर ही आतापर्यंत पाच फेऱ्यांपर्यंत मतमोजणी झाल्याने उर्वरित फेऱ्यांमध्ये निकाल काय येणार ते पाहणे उत्सुकचे असणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात पटवर्धन चौकापासून ठीक ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त कार्यरत ठेवण्यात आला आहे.
दिगंबर वालावलकर /कणकवली





